शेण्णिले स्पर्श
Author: सुलभा कोरे
Translation: दिलीप बोरकार
Publisher: बिम्ब प्रकाशन, गोवा – 2017
‘हरवलेले स्पर्श‘ या माझ्या मराठी कविता संग्रहाचा संवेदनशील कोकणी अनुवाद म्हणजे ‘शेणिल्ले स्पर्श‘. शब्द व भाषेच्याही आधी जन्माला येतो तो स्पर्श. या स्पर्शांची भाषा प्रत्येक भावनेप्रमाणे बदलते अन हाच स्पर्श आपल्याला जीवनाच्या अंतापर्यंत सोबत करतो. काळाच्या ओघात हरवलेल्या स्पर्शांच्या या संवेदनशील कवितांचा साहित्य अकादमी पुरस्कार विजेते दिलीप बोरकार या संवेदनशील कविने केलेला तेवढाच भावप्रणव अनुवाद.